fbpx
solapur city news 24 माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात एक कोटींहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई  – राज्यातील महिलांचा माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रापासून सुरू असलेल्या या अभियानात आतापर्यंत सुमारे १ कोटी ४ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, हे अभियान १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे व पुढेही पाठपुरावा केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

पुणे शहरातील 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार

              राज्‍यात १८ वर्षावरील महिला, माता, गर्भवती यांच्‍या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक २६ सप्टेंबर पासून आरोग्‍य तपासणी कार्यक्रम एकात्मिक बाल विकास विभाग , व इतर विभाग यांच्‍या समन्‍वयाने राबविण्‍यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील महिलांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

              राज्‍यातील १८ वर्षावरील महिलांना, मातांना, गर्भवतींना प्रतिबंधात्‍मक आणि उपचारात्‍मक आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्‍यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्‍ध करुन देणे उद्दिष्‍ट आहे. सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैदयकिय अधिकारी आणि स्‍ञीरोगतज्ञामार्फत १८ वर्षावरील महिलांची, नवविवाहीत महिला, गर्भवती यांची तपासणी , औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची सुरवात करण्यात आली. आशा/अंगणवाडी आरोग्‍य सेविका/सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्‍ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update