Fund शेतकरी

पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत २ हजार २९७ कोटी ६ लाख रूपये नोव्हेंबर २०२० मध्ये वितरित करण्यात आले होते. तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.१० हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रती हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143