Helth
Maharashtra

Helth : राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत ? आरोग्य मंत्र्यांचे मोठं विधान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Helth ओमिक्रोननं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली असताना ओमिक्रोनचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्याचं समोर आलंय. नव्यानं ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय. सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळेला ओमिक्रोन आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

येत्या 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता; जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता

Helth राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. लसीकरणासाठी गावागावातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय हे काम अशक्य आहे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस Helth देण्यासाठी या संस्थेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संस्थेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असंही टोपे म्हणाले.

            महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं Helth पालन करावे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. दरम्यान, औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण केल्याची खात्री करूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना महाविद्यालयात बसू द्या, अन्यथा बसू देऊ नका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या आदेशाचं मी समर्थन करत नाही. मात्र लसीकरण जरी ऐच्छिक असलं तरी ते गरजेचं आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचं आहे, असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews