Solapur City

म्हणून सोलापुरात वानकर-काळजे गटात एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापुरात युवासेनेच्या पदाधिकारी बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते, सोलापूर शहर मध्य शहर उत्तर व शहर दक्षिण या भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला युवा सेनेचे जिल्हा निरीक्षक विपुल पिंगळे हे मार्गदर्शन करणार होते.

हे वाचाबापरे ! सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत ५७ रस्ते पाण्याखाली; या मार्गावरील रस्ते खुले

             या बैठकीसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांची उपस्थिती होती मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच एका बाजूला विठ्ठल वानकर यांचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला मनिष काळजे यांचे कार्यकर्ते थांबले होते. वानकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली मनीष काळजे हटाव, युवासेना बचाव…, मनीष काळजे यांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी तसेच फलक घेऊन वानकर यांचे कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी केली. दुसऱ्या बाजूला मनिष काळजे यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, मनीष काळजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी एकमेकांच्या विरोधातील घोषणाबाजीने शासकीय विश्रामगृहात ते परिसर दणाणून गेला होता शेवटी निरीक्षक विपुल पिंगळे यांनी बैठक रद्द केल्याचे समजले, याच वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी गेले मात्र दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकाच्या विरोधात घोषणाबाजी ऐकून त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, यावरून शिवसेनेतील गटबाजी हे चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com