min. tanpure 750x375 1
Economy Maharashtra National

वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकांकडून कर्ज मिळणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकेकडून कर्ज मिळणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात वनहक्क धारकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, बॅंका वनहक्क धारकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ करत असल्याने लाभार्थी कर्जापासून वंचित राहत होता. हे लक्षात घेता आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी, बॅंक व्यवस्थापक आणि आदिवासी विकास विभागांच्या अधिकाऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे निर्देश दिले. शासन बॅंकांना लागणारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. त्यानंतर बॅंकांनी राज्यमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

                   बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, आदिवासी संशोधन व विकास  संस्थेच्या सहसंचालिका जागृती कुमरे, अवर सचिव रविंद्र गोरवे, अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक वालावलकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापक करपे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com