Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Home Minister- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महा होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन खड्डा तालीम व नगरसेवक सुनील कामाटी यांच्या संयुक्त विद्यमाने १० राऊंड व अंतिम सोहळा ०६ मार्चरोजी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ काल रोजी २२/०२/२००२२ प्रकाश बापूजी हाउसिंग सोसायटी लष्कर येथील श्री गणेश हॉल या ठिकाणी करण्यात आला. स्पर्धेच्या सुरुवात श्री गणेश पूजन व छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजनाने करण्यात आली.
Home Minister शुभारंभ यावेळी नगरसेवक सुनील कामाटी, नगरसेवक रवी कैय्यावाले, अंबादास माढेकर, विजय म्हेत्रे, अनिल कामाठी आदींसह मोठ्या संख्येने स्पर्धकांसह मोठ्या संख्येने माता भगिनींची उपस्थिती होती. सौभाग्यवती की श्रीमती कोण होणार सुवर्ण विजेती या पहिल्या राऊंडसाठी होम मिनिस्टर भाऊजी म्हणून ओळख असलेले निवेदक बळवंत जोशी यांनी आपल्या खुमासदार व विनोदी वाणीने सर्व माता – भगिनीचे या कार्यक्रमात भरपूर मनोरंजन केले. यामुळे सदर माता-भगिनी हे सुवर्ण जिंकण्यासोबत निवेदकाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
सोलापूरात शहिद अशोक कामटे विचारमंच तर्फे शहिद अशोक कामटे यांच्या 57 वी जयंती निमित्त अभिवादन
यावेळी आलेल्या सर्व माता – भगिनी नगरसेवक सुनील कामाठी यांचे तोंडभरून कौतुक करत होते की आम्ही कामगार वस्तीतले लोक आम्हाला कोठे जाणे होत नाही. आमच्या दारी आमच्या नगरात एवढा सुंदर कार्यक्रम व मोठ्या बक्षिसाची स्पर्धा घेतल्याबद्दल आभार मानले. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ०६ मार्च रोजी होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यासाठी पहिल्या फेरीतून ११ विजेत्या निवडण्यात आले. महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्यांची नावे शितल हणमालरेल,सारिका बाबानागरे, अंजु मोरे, श्रद्धा म्हेत्रे,रेणुका म्हेत्रे,नंदिनी म्हेत्रे,इंदू म्हेत्रे,उमा म्हेत्रे,अंजली काळे,अश्विनी माढेकर,प्रियांका माढेकर आदी विजेत्या ठरले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews