Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Hospital- सोलापूर महानगरपालिका, सोलापूर अंतर्गत कार्यरत असलेल्या अनुक्रमे भावनाऋषी, बिडी घरकुल व शेळगी या नागरी आरोग्य केंद्रा करिता R P गोयंका फाउंडेशन यांचे मार्फत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व यातून फिवर क्लिनिक देन्यात आलेले आहेत. सदर फीवर क्लिनिक चे उद्घाटन मा. आयुक्त श्री. पि. शिवशंकर यांचे हस्ते आज रोजी संपन्न झाले.
बाळीवेस येथील बीओटी प्रकल्प दीड महिन्यात होणार पूर्ण
सदर फिवर क्लिनिक मार्फत गोर गरीब तसेच गरजू रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची साथरोग तसेच इतर काळात देखील आरोग्य विषयक सोय होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.आयुक्त यांनी यावेळी बोलताना केले.
सदर प्रसंगी मा. आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी मा. आयुक्त यांचे आभार व्यक्त केले आणि मा.आयुक्त श्री. पी. शिवशंकर यांच्या कार्यकाळात सोलापूर महानगरपालिका अंतर्गत दवाखाने, प्रसुतीगृहे व नागरी आरोग्य केंद्रातील सेवा सुविधा यांचा दर्जा तसेच तपासणीच्या सोयीसुविधा यामध्ये मोलाची भर पडलेली आहे. तसेच एक्स रे सुविधा १३ आरोग्य केंद्राच्या ठिकाणी माफक दरात उपलब्ध आहे. सोनोग्राफी ची सुविधा दोन प्रसुतिगृहामध्यं उपलब्ध आहे आणि सदर ठिकाणी तज्ञ डॉकटर कार्यरत आहेत. त्याच बरोबर पू. रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने नूतनीकरण तसेच अद्ययावतीकरण याचे देखील कामकाज सुरू असून लवकरच रुग्णाच्या सेवेत सुरू होणार आहे. याच जोडीला शहरातील वंचित घटकांकरिता एकूण १२ अर्बन हेल्थ आणि वेलनेस सेंटर कार्यान्वित होणार असून याचा फायदा तळागाळातील तसेच गरजू नागरिकांना होणार आहे. मदर तेरेसा पॉली क्लिनिक येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता अत्याधुनिक मशीन लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.सदर प्रसंगी डॉ. अतिश बोराडे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. ज्योती साळवे, डॉ. शैला सरोदे, डॉ. नफिसा बागवान, डॉ. शिवकांची चप्पा तसेच नागरी आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्यसेविका, मेट्रन आशा स्वयंसेविका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143