Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव ’आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रूग्णालय’ असं करण्यात आलंय. महर्षी वाल्मिकी संघाने याची घोषणा करत रूग्णालयावर या नावाचा नामफलकही लावला.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्याच्याच कांही अंतरावर असलेल्या एका चौकास आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नांव दिलेले आहे. त्या चौकाच्याच जवळ असणार्या सामान्य रुग्णालयासही आज आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नांव दिले आहे. अशी माहिती यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे हे आम्हा आदिवासी कोळी जमातीमधील वंदनीय महामानव असुन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अनमोल आहे. क्रांतीची मशाल घेऊन देशभरात देशभक्तीची ज्योत पेटवतानाच इंग्रजांनी त्यांना चंद्रभागेच्या पात्रात अटक केली आणि कांही दिवसानंतर त्यांना फाशी दिली. अशा या महान क्रांतीविराचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, तरुणाईला त्यांचा जाज्वल्य इतिहास माहित व्हावा या उद्देशाने आम्ही आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सामान्य रुग्णालयास त्यांचे नांव देत आहोत. जर कोणी या नामफलकास धक्का लावला किंवा हे नांव बदलण्याचा शब्द जरी काढला तर आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने जशास तसे उत्तर देऊ. असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143