Ideal project of rural development
Maharashtra Solapur City

मंगळवेढा तालुक्यात ग्रामविकासाचे आदर्श प्रकल्प; सोलापूर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये सोलापूर सोशल फाउंडेशनच्या प्रेरणेने आणि सहकार्याने ग्रामविकासाचे विविध प्रकल्प राबवले जात असून त्यातून अनेक कौतुकास्पद उपक्रम समोर येत आहेत. त्यातूनच मल्लेवाडी या गावाला सर्वाधिक वृक्ष लागवड केल्याबद्दल हरित ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


               देगाव येथे समृध्द गाव अभियानाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन प्रदूषण नियंत्रणाच्या हेतूने प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात आले. त्याचबरोबर मारापूर या गावाला फळबाग लागवड आणि चिलारमुक्ती हे दोन उपक्रम राबवण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना सोलापूर सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक आ. सुभाषाबापू देशमुख व आ.समाधान आवताडे यांची उपस्थिती लाभली होती.  देगाव येथे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्याच्या बाबतीत ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला सरपंच राणी ढेकळे, उपसरपंच शरद डोईफोडे, ग्रामसेविका राखी जाधव हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात आ. सुभाषबापू यांच्या हस्ते वृक्षारोपण करून गावातल्या बाल वाचनालयाला २०० पुस्तके देण्यात आली. 
सोलापूर सोशल फाउंडेशनने मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यासाठी वृक्षारोपण स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत मल्लेवाडी या गावाने सहभाग नोंदविला आणि भरपूर वृक्षारोपण केले. त्याबद्दल मा. सुभाषबापू यांच्या हस्ते या गावाला हरित ग्राम सन्मानपत्र आणि ढाल देण्यात आली. आ. सुभाषबापू देशमुख यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना मल्लेवाडी हे गाव आता झाडांचे गाव म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

हे वाचावांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

            मारापूर येथे चिलार ह्या टाकावू वनस्पतीचे निर्दालन करण्याचे ठरवण्यात आले आणि गावात भरपूर फळझाडे लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी आ. समाधान आवताडे उपस्थित होते. सोलापूर सोशल फाउंडेशनने समृध्द गाव योजनेसाठी आपल्या मतदारसंघाची निवड केली याबद्दल आ. समाधान आवताडे यांनी समाधान व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमांना विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोशल फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे,सल्लागार मोहन अनपट, हरिभाऊ यादव, विजय पाटील, विजय कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com