Economy Solapur City

दक्षिण व उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्याकरीता सिना नदीत तात्काळ पाणी सोडा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
आमदार प्रणिती शिंदे यांची मा. जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी.
सोलापूर- सोलापूर जिल्हयातील दक्षिण व उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तीन्ही तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्याप्रमाणात होत आहे. सध्या सीना नदीमध्ये पाणी नसल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगांव, पाकणी, नंदूर व दक्षिण तालुक्यातील हत्तूर, वांगी, वडकबाळ, चंद्रहाळ, सिंदखेड, मनगोळी, अकोले (मं.), गुंजेगाव, होनमुर्गी, राजूर, बिरनाळ, बंकलगी, आहेरवाडी, औराद, संजवाड, बोळकवठे आणि अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव आदि 25 गावातील शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहेत, पाण्याअभावी येथील पिके जळून जात आहेत. सदर भागामध्ये जनावरांना व माणसांना पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. सदरची पाणी टंचाई दुर होण्याकरीता तात्काळ उजनी धरणाचे पाणी सिना नदीत सोडण्यात यावे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास जयंत पाटील साहेब यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com