Maharashtra

रेमिडीसिव्हर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करा; माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख कडाडले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर-  सोलापूर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसिव्हर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आ. विजयकुमार देशमुख यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना दिला आहे. या विषया संदर्भात आ. देशमुख यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सुद्धा तातडीने सोलापूर जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ. देशमुख यांना दिले आहे.

सोलापूर जिल्‍हयात रेमिडीसिव्हर इंजेक्‍श्‍नचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे कोरोना रूग्‍णांचे हाल होत आहेत. मृत्‍युदर वाढत आहे मात्र सोलापूर जिल्‍हयासाठी इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाहीत ही चिंतेची बाब आहे . आपण नाशिकला ७ हजार इंजेक्‍शन उपलब्‍ध केले, मुंबई व नागपूर साठी सुध्‍दा इंजेक्‍शन उपलब्‍ध केले, मात्र सोलापूर जिल्‍हयासंदर्भातच असा सापत्‍न भाव का असा प्रश्‍न मनात निर्माण झाला आहे. आपण त्‍वरीत इंजेक्‍शन सोलापूर जिल्‍हयासाठी उपलब्‍ध करून द्यावेत, अशी मागणी आ. देशमुख यांनी केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com