Covid 19 Health

ऑक्सिजन हवेतून मिळण्यासाठी साईबाबा संस्थानने तातडीने प्लँट सुरु करावा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

शिर्डी- कोविडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोविडबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज पडते. येणाऱ्या काळात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याने, कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन वायूच्या पुरेशा उपलब्धतेसाठी साईसंस्थानने साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल येथे हवेतून ऑक्सिजन मिळण्यासाठी आवश्यक प्लँट तातडीने उभारण्याचे निर्देश पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.

राहाता तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, शिर्डी परिसरातील कोविड केअर सेंटरची पाहणी तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसलिदार कुंदन हिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ओमप्रकाश पोखर्णा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ.प्रितम वडगावे, साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, सचिन चौगुले, रमेश गोंदकर यावेळी उपस्थित होते.

                        साईबाबा सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे जवळपास 550 बेड्स असून त्यापैकी 150 बेड्स नॉन-कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवावे आणि उर्वरित चारशे बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सूचना यावेळी पाकलमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केली. कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या बेड्ससह ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याचे तसेच यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने कारवाई सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री महोदयांनी दिले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनीही स्वयंशिस्तीचे पालन करुन जनता कर्फ्यु लागू करावा, असे आवाहन यावेळी मंत्रीमहोदयांनी केले. यासाठी ग्राम समिती आणि प्रभाग समित्यांनी पुढाकार घेण्याची सूचना त्यांनी केली. राहाता व आजूबाजूच्या तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचारासाठी शिर्डी येथे योग्य व्यवस्था केल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, अशी आशा मंत्री मुश्रीफ व्यक्त केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com