immunization camps at Bandra
Maharashtra

वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज वांद्रे, विलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण  शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली. सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी श्री. ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर, विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत आज प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.

WhatsApp Image 2021 08 18 at 16.38.01 1

हे वाचाराज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान

लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविड विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुभाष सावंत, माजी महापौर प्रि.विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक सदा परब, शेखर वायंगणकर, श्रीमती रोहिणी कांबळे, संदीप नाईक, युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com