Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर शहरात खास करून हद्दवाढ भागामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील नीलम नगर, जुळे सोलापूर, विजापूर रोड, नई जिंदगी यासह विविध ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. हद्दवाढ भागातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यादरम्यान वयोवृद्ध नागरिकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील अनेक लसीकरण केंद्रे लांब अंतरावर असल्याने जेष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे हद्दवाढ भागात आणखी काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. नीलम नगर, जुळे सोलापूर, विजापूर रोड, नई जिंदगी या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे. या भागात मोफत लसीकरण केंद्र सुरू करावे. जेणेकरून येथील नागरिकांची सोय होईल, असे आ. देशमुख यांनी म्हटले आहे.