Solapur City News
Covid 19 Health

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोराना विषाणूचा प्रादुर्भाव व होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी तसेच नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पथकाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना व शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. कोविड आजाराबाबत सर्वत्र दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा.  नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. कॅन्टेमेंट प्लॅननुसार प्रतिबंधित क्षेत्रात अधिक प्रमाणात घरोघरी जाऊन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे निरीक्षण करावे. तसेच आयएलआय व सारीच्या रुग्णांवर पाळत ठेवावी. या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, व खाजगी डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित  असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

                प्रत्येक रुग्णामागे कमीतकमी 20 ते 30 जवळचे संपर्कातील सदस्य, शेजारी यांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग व ट्रॅकिंग करावे. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची काटेकोरपणे तपासणी करावी. यासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. चाचण्याची संख्या वाढविल्यास वेळीच कोविड रुग्णांची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करता येतील. आरटीपीसीआर मुख्य आधार असला तरी त्यानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कॅन्टेमेंट झोन आणि  बसस्थानक, रेल्वे स्टेशन, झोपटपट्टी व जास्त घनता असलेल्या  अति जोखमीच्या क्षेत्रात रॅट किटस्‍ चाचणीसाठी वापर करा. कॅन्टेमेंटबाबत शासनाने आखलेले धोरण अंमलात आणा. पॉझिटिव्ह प्रकरणांची संपर्क सूची आणि संपर्काचे डिजिटल मॅपिंग, मोठ्या प्रमाणात करुन प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात यावेत. बफर झोन निश्चित करणे आवश्यक आहे. झोनमध्ये आवागमनावर नियंत्रण ठेवावे व जलद प्रतिसाद पथकाद्वारे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

                   गृह विलगीकरणातील रुग्णांचा आरोग्य विभागामार्फत आढावा घेऊन होम आयसोलेशन करताना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. रुग्णांचे ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासावी. आवश्यकता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात दाखल करावे. विविध रोगाने आजारी रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. आवश्यक सेवा वितरीत करण्यासाठी कोरोना योध्दाच्या मनातील लसीकरणाबाबतची भिती व संकोच दूर करावा. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, कॅन्टेमेंट ऑपरेशन, होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांवर पाळत ठेवावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोविड रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील विवेक हॉस्पीटल, सुभाष नगर येथे व्हॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र दिले असून त्याबाबत शासन मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143