fbpx
FB IMG 1620733201107 दिलासादायक! खाजगी झोपडपट्टीवर रमाई आवास योजना राबविणार
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार – मा. सामाजिक न्याय मंत्री

सोलापूर- आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील शिष्टमंडळासमवेत यांच्या उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे कक्षात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मा. सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. यामध्ये सोलापूर महानगरपालिका हद्दीत एकूण 220 झोपडपटया असून त्यातील 159 अधिसुचित झोपडपट्टी असून 61 झोपडपटया ह्या अधिसुचित नाहीत. 159 अधिसुचित झोपडपटया पैकी 88 झोपडपटया खाजगी जमिनीवर 26 झोपडपटया मनपा जमिनीवर व 45 झोपडपटया शासकीय जमिनीवर आहेत तसेच 61 अधिसुचित नसलेल्या झोपडपटया पैकी 48 झोपडपटया खाजगी जमिनीवर, 6 झोपडपटया मनपा जमिनीवर व 7 झोपडपटया ह्या सरकारी जमिनीवर वसलेल्या आहेत. तसेच खाजगी जागेवरील अशा लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने असे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे योजना परिणामकारकरित्या राबविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. याकरीता रमाई आवास योजनतील शासन निर्णयामध्ये खाजगी जागेवर असलेल्या घोषित-अघोषित झोपडपटयांचा समावेश करण्यासंबंधी तसेच योजनेमधील स्वसुरक्षित ही जाचक अट रद्द करुन सदर घरकुल योजनेची अनुदान रक्कम रु. 7 लक्ष करण्यात यावे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे मागणी केली.
याबाबत मा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी मा. सचिव सामाजिक न्याय, समाजकल्याण आयुक्त यांना आदेश दिले कि, येत्या आठ दिवसात खाजगी जमिनीवरील झोपडपट्टयांमधील जागा अधिग्रहण करून त्यावर रमाई आवास योजना राबविण्यासंदर्भात धोरण तयार करण्यात यावे. याबद्दल जर गरज भासल्यास पुढच्या आठवड्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत सदर धोरण राबविण्याबाबतचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतला जाईल असे मा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले. तसेच सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेतील थकीत रक्कम लवकरात लवकर महानगरपालिकेस देण्याचे आदेश मा. समाजकल्याण आयुक्त यांना दिले.
                           यावेळी मा. सामाजिक न्याय सचिव शाम तागडे, मा. समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवडे, मा. समाजकल्याण अधिकारी, सोलापूरचे कैलास आडे, दिनेश डिंगळे, नगरसेवक चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आसादे सर, नगरसेवक प्रविण निकाळजे, बाबा करगुळे, शाम सावगे, नागनाथ बंगाळे, नागनाथ कासलोलकर, सायमन गट्टू, मिरा घटकांबळे, हणमंतू सायबोळू, सुरेश पाटोळे, उमेश सुरते, युवराज पवार, प्रमिला तुपलवंडे व संबंधित शिष्ट मंडळ उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update