inauguration-development-works
Fund Solapur City

प्रभाग क्र. 24 मध्ये आ. देशमुख यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- प्रभाग क्र. 24 जुळे सोलापूर भागातील सत्यनारायण नगर येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते विकासकामाचा शुभारंभ  करण्यात आला. याला निमित्त होते नगरसेविका  संगीता जाधव यांच्या भांडवली निधीतून करण्यात येणार्‍या ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. अध्यक्ष स्थानी इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक ए. डी. जोशी होते.

हे वाचा- अककलकोट कोतवाल संघटनेचे मागण्या मान्य न झाल्यास एक दिवस धरणे आंदोलन करणार

           आ. सुभाष देशमुख यांनी   या भागात मोठ्या प्रमाणात रस्ते झाले. यापुढे आपल्या निधीतून विविध नगरातील अंतर्गत रस्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.  यावेळी ए.डी. जोशी, दिगंबर राजेगावकर व  ललिता परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचलन  राजलक्ष्मी वानखेडे यांनी केले. यावेळी भाजप दक्षिण मंडळ अध्यक्ष महेश देवकर, सरचिटणीस आनंद बिराजदार, भटके विमुक्त मोर्च्याचे विशाल गायकवाड,  मधुसूदन जंगम, प्रारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश जाधव, शिवराज भोसले, सचिन चौगुले, नगरातील वायचाळ, सुचित्रा कालेकरं, रेणुका कराळे, अजय कुलकर्णी, स्मिता वायचळ आदींसह नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143