fbpx
Inauguration

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

प्रभाग 3 येथे मकर संक्रांतीनिमित्त भव्य रस्ता कामाचे उद्घाटन

सोलापूर Inauguration- मकर संक्रात निमित्त भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भांडवली निधीतून प्रभाग ३ येथील श्रीनिवास चिम्मन घर ते सुदर्शन संदुपटला घरापर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आले.

भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Inauguration  सोलापूर महानगरपालिका मध्ये पक्षविरहित प्रामाणिक जनतेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाचं निवडून आणा असे प्रतिपादन नरेंद्र गंभीरे यांनी केले. सुरेश पाटील यांची ओळख म्हणजे सिद्धेश्वरांनी जसे काय कवे कैलास सांगितलेले आहे त्यातूनच त्यांची खरी ओळख होती तसे सोलापूर महानगरपालिकेत सलग 5 वेळा निवडून येणे हेच त्यांची ओळख आहे. आजारी असतानाही आण्णांनी जनतेची कामे केली आहे तसेच न आल्यानंतरही जाहीररित्या क्षमाशील व्यक्त करतात. आणि तुमच्यात मिसळण्याची कला अण्णांकडे आहे. मकरसंक्रात निमित्त रस्त्याच्या कामाला उदघाटन जरी होत असले तरी रस्त्याची काळजी घेणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना म्हणजे सुरेश पाटील यांच्या सारख्या काम करणाऱ्या जनसेवकाला निवडून द्यावे. असे आव्हान गंभीरे यांनी केले.
                मकर संक्रात निमित्त भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 3 येथील श्रीनिवास चिम्मन घरापासून ते सुदर्शन संदुपटला घरापर्यंत रस्ता कामाचे पूजन समारंभ श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभीरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचे सरचिटणीस शशिकांत थोरात, बिज्जू प्रधाने, प्रा. चन्नवीर चिट्टे, उद्योजक सुरेश बिद्री, श्रीनिवास चिम्मन, नागनाथ येले, सुदर्शन संदुपटला, प्रभाकर रेशीमकर, श्रीनिवास वल्याळ आणि नगरसेवक सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते धार्मिक विधीवत पूजनाने करण्यात आले. प्रारंभी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी विकासाचे कुठलेही राजकारण न करता सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला असल्याचे प्रास्ताविकात नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले. या भागातील नागरिकांनी या परिसरात पिण्याचे पाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे तक्रार मांडताच तत्काळ सुरेश पाटील यांनी तातडीने निधी मंजूर करून संबंधित अधिकाऱ्यांना याठिकाणी उच्च दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी सूचना देऊन हे काम मार्गी लावण्याचे सांगितले.
               सुरेश आण्णा हे जनतेच्या मदतीला कसे धावून येतात हे सर्वांना ज्ञात आहे. आजारी असतानाही जनतेची कामे करत एक आजारी नगरसेवकही जनतेची कामे मार्गी लावत असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश पाटील आहेत अशी भावना प्राध्यापक चन्नवीर चिट्टे यांनी व्यक्त केले. यावेळी भाजप शहर सरचिटणीस शशिकांत थोरात म्हणाले की, प्रभाग 3 मध्ये आजवर सर्व विकासकामे झाली असून दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या रस्ते, ड्रेनेज व पाण्याचे काम पूर्ण होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. प्रभाग 3 मधील दाळगे प्लॉट, इंदिरा वसाहत, सोनानगर अश्या ठिकाणी विकासकामांची सुरुवात झाली असून मागील आठवड्यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्यणशेट्टी यांच्या हस्ते उदघाटन Inauguration केलेल्या रस्त्याचे आज कायापालट झाल्याची माहिती थोरात यांनी दिले.
                यावेळी अनुसूचित जाती जमातीचे अशोक कटके, श्री नीलकंठेश्वर संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास वल्याळ आदी मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर चिम्मन, प्रविण बोगा, काशिनाथ गड्डम, रमेश वल्याळ, श्रीनिवास नंदाल, श्रीनिवास मागनुर, मधुकर चीम्मन, मधुकर मायकोटी, कमलाकर चिम्मन, रामचंद्र नराल, राजशेखर यंनगधूल, शरणप्पा पुजारी, प्रकाश एरणी, गणेश मागनुर, विनीत गजेली आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन चोपडे यांनी केले तर आभार बीपीन पाटील यांनी मानले.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update