Solapur City

प्रभाग ९ मध्ये नवीन रस्त्याच्या कामाचा नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या हस्ते शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापुर- प्रभाग ९ मध्ये रविवारपेठ कोले लॅब – मंजेली घर ते धरमकाटा पर्यत रस्त्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला. या प्रभागाच्या भाजपचे हितचिंतक कै. प्रकाश मंजेली यांनी पाच वर्षे महापालिका प्रशासनाकडे व नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.मागील अनेक वर्षे जे काम इतरांना जमले नाही ते नगरसेवक नागेश वल्याळ यांनी करून दिल्याचे समाधान स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टातील याचिका मागे

               रहिवाशांना नव्याने रस्ता मिळावा यासाठी नगरसेवकपदाच्या कालावधीत नगरसेवक नागेश वल्याळ यांनी पालिका आयुक्त व विभाग अधिकारी कार्यालय व संबंधितांच्या भेटीगाठी घेवून मागणीचा पाठपुरावा केला. या रस्त्याच्या कामास महापालिका प्रशासनाने सुरूवातही केली. नवीन रस्त्याचे कामाला सुरूवात करताना भाजपा हितचिंतक कै प्रकाश मंजेली यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेवक अविनाश बोमड्याल, नगरसेविका सौ राधिका पोसा,जनसेवक दत्तात्रय पोसा, युवा मोर्चाचे सिद्धार्थ मंजेली, शंकर मंजेली, बुधण्णा मंजेली, नेहरू मंजेली, चंदू मंजेली,लक्ष्मण मंजेली ,राजू मंजेली, अनिल मंजेली, किसन दुर्लेकर, मंजेली, सागर धोत्रे, सोनल मंजेली, शुभम मंजेली, किरण जाधव, ख्वाजा दुर्लेकर, गणेश मंजेली, शुभम देसाई उपस्थित होते

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com