Axident Maharashtra

भरधाव फॉर्च्युनर व स्विफ्ट डिझायर कारची समाेरासमाेर धडक; दौलताबादच्या किल्ल्याजवळील घटना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

दौलताबाद- भरधाव फॉर्च्युनर व स्विफ्ट डिझायर कारची समाेरासमाेर धडक हाेऊन त्यात स्विफ्टमधील तिघांचा मृत्यू झाला, तर दाेन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (२४ एप्रिल) मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास दौलताबाद किल्ल्याजवळील पोलिस चौकीसमाेर झाला. दीपक पोपटराव खाेसरे (४५), राजू आसाराम मानकीकर (३४, दाेघेही रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद), मदन अशोक जगताप (२८, रा. मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे अाहेत. शिवसेनेचे खुलताबाद तालुकाप्रमुख राजू रंगनाथ वरकड (४७, रा. ज्योतीनगर, औरंगाबाद) व सुनील कृष्णा आवटे (४३, रा. कसाबखेडा) हे गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त फॉर्च्युनर कार छावणी परिसरातील असून त्यात दोन व्यक्ती होत्या. अपघात हाेताच या गाडीची एअर बॅग उघडल्यामुळे त्या दोघांचा जीव वाचला. दीपक खोसरे, मानकीकर, जगताप, वरकड व अावटे हे पाच जण शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास स्विफ्ट कारने (एमएच २० डीजे १७७१) खुलताबाहून औरंगाबादच्या दिशेने येत होते, तर फॉर्च्युनरमधून (एमएच २० सीएस ५४६२) दाेन जण छावणीतून खुलताबादच्या दिशेने जात होते. दाैलताबादच्या किल्ल्यासमोरील वळणावर भरधाव जाणाऱ्या दोन गाड्या एकमेकावर धडकल्या. फॉर्च्युनरच्या धडकेने स्विफ्ट कारची चालकाच्या विरुद्ध दिशेला असलेली बाजू पूर्णपणे दबली गेली. त्या बाजूला असलेल्यांना मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत पाठवले. यात उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला, तर दाेघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दौलताबाद पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

फॉर्च्युनरमधील दाेघे गायब
अपघात झाल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्या वेळी फॉर्च्युनरमधील दाेघेही गायब हाेते. प्राथमिक तपासानुसार, जखमी झाल्याने हे दाेघे स्वत: उपचारासाठी गेले असावेत, अन्यथा कारवाईच्या भीतीने पळून गेले असावेत. ही गाडी शहरातील छावणी परिसरातील खान नावाच्या व्यक्तीची असल्याचे नंबरवरून समाेर अाले अाहे. रविवारी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गाडीमालक काेण अाहे याचा पाेलिस शाेध घेत अाहेत. पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत.

धाेकादायक वळणावर दीड वर्षात नऊ जणांचा मृत्यू
दाैलताबाद किल्ल्यासमोरील वळण धाेकादायक आहे. घाट उतरून येणारी वाहने ही कायम वेगात असतात, तर खुलताबादच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वळण असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक अपघात घडलेले अाहेत. गेल्या दीड वर्षात या ठिकाणी नऊ जणांचा अपघाती मृत्यू झालेला अाहे. या ठिकाणी गतिरोधक तयार केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी गावकरी वारंवार करत अाहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात याच ठिकाणी विहिरीत गाडी गेल्यामुळे पाच तरुणांचा मृत्यू झाला होता, तर काही महिन्यांपूर्वी या वळणावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या शिक्षकाला कारने उडवले होते.

गल्लेबोरगावात दाेन कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले, गावात शाेककळा
मृत दीपक खोसरे हे खुलताबाद बाजार समितीचे संचालक होते. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. गल्लेबोरगाव येथे ते राहत असून त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हॉटेल व्यावसायिक राजू मानकीकर हे खाेसरेंच्या घराजवळच राहात हाेते. त्यांनादेखील एक मुलगा आणि मुलगी आहे. एकाच दिवशी दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने गल्लेबोरगावात शोककळा पसरली आहे. तिसरे मृत मदन जगताप हे मुकुंदवाडी येथील रहिवासी असून राजू वरकड यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होते. वरकड यांना सोडण्यासाठी हे सर्व अाैरंगाबादेत येत हाेते.
दाैलताबादजवळील अपघातात दाेन्ही कारचे माेठे नुकसान झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त फाॅर्च्युनर कार ताब्यात घेतली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com