include-part-of-solapur-district
Solapur City

दक्षिण पश्चिम रेल्वेतील सोलापूर जिल्ह्याचा भाग मध्य रेल्वेत समाविष्ट करा – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

हुबळी विभागीय रेल्वेच्या बैठकीत मागणी ; सर्व पॅसेंजर सुरु करण्याची मागणी 

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होटगी रेल्वे स्टेशन पुढील तडवळचा भाग हा दक्षिण पश्चिम रेल्वे , हुबळी मंडल कार्यालयांतर्गत येतो. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना प्रशासकीय कामासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण पश्चिम रेल्वेचा भाग हा मध्य रेल्वेत समाविष्ट करावा. तसेच हुबळी ते सोलापूरमार्गे नवी दिल्ली, जम्मू तावी अशी नवी रेल्वे सेवा सुरु करावी यासह सर्व पॅसेंजर गाड्या तात्काळ सुरु करण्याची मागणी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली. हुबळी विभागीय दक्षिण पश्चिम रेल्वेची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात येणारा हुबळी विभागीय रेल्वेच्या भागातील प्रलंबित व प्रस्तावित कामांची मागणी केली. ये भागात येणाऱ्या समस्या लक्षात आणू देत रेल्वे कर्मचारी, प्रवासी, नागरिक यांची होणारी अडचण मांडली. सोलापूर जिल्ह्यातील होटगी रेल्वे स्टेशन पुढील २० कि. मी पासूनचा भाग हा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या, हुबळी मंडलात येतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मंडल कार्यालयापासून अगदी जवळचे अंतर असूनही रेल्वे कर्मचारी व नागरिकांना आस्थापना, प्रशासकीय कामासाठी २५० कि.मी लांबचा प्रवास करावं लागतो. हि गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण पश्चिम रेल्वेचा भाग हा मध्य रेल्वेत समाविष्ट करावा. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ रेल्वे बोर्डाकडे पाठवावा अशा सूचना खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिल्या. 

हे वाचा- बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून कामगारांना 10 हजार रू दिवाळी भेट द्या; लाल बावटा बांधकाम कामगार मंडळाची मागणी

        तसेच हुबळी ते सोलापूरमार्गे नवी दिल्ली, जम्मू तावी पर्यंत जाणारी नवी रेल्वे सेवा सुरु करावी. यामुळे बेल्लारी पासून प्रवास करणारे मिलिटरी, पॅरामिलिटरीचे सैनिक, प्रवासी यांना मोठी मदत मिळणार आहे. तसेच दिल्ली व वैष्णवदेवी कडे जाणाऱ्या प्रवाश्यांना मोठी मदत मिळणार असल्याचेही सांगितले. गा.क्र 71303/04 गदग- सोलापूर- गदग, गा.क्र 57133/34 विजयपुर- रायचूर- विजयपुर, गा.क्र 57129 विजयपुर- बोलारम- हैदराबाद- विजयपुर, गा.क्र 7685/86 सोलापूर- विजयपुर- सोलापूर, गा.क्र 51029/30 मुंबई- विजयपुर- मुंबई (फास्ट पॅसेंजर) या सर्व पॅसेंजर गाड्या तात्काळ सुरु करण्याची मागणी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली. तडवळ रेल्वे स्थानकावर ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अडचण भासते. यासाठी वेळेपूर्वी कार्यवाही करण्याची सूचनाही केली. प्रलंबित प्रश्नासह प्रस्तावित विकास कामांची मागणी केल्याने मध्य रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेसमन्वयातून कामे केली जातील. त्यासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचेही खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, विजयपूरचे खा. रमेश जिगजिनगी, यांच्यासह मंडलात येणारे लोकसभा, राज्यसभा सदस्य उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143