Income Tax
Maharashtra Maharashtra Gov

Income Tax : 31 डिसेंबरपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा अन्यथा 1 जानेवारीनंतर द्यावी लागेल दंड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

नवी दिल्ली Income Tax  इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax Return File) करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. जर तुम्ही ही डेटलाईन चुकवलीत तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. काही असे टॅक्सपेयर सुद्धा आहेत जे कालमर्यादा संपल्यानंतर सुद्धा कोणत्याही पेनल्टीशिवाय आपला आयटीआर दाखल करू शकतात. कोणत्या टॅक्स पेयर्सला ही सूट मिळेल, ते जाणून घेवूयात. (Income Tax Return File)

द्यावा लागेल 5,000 रुपये दंड

Income Tax  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी खढठ भरण्याची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवून 31 डिसेंबर 2021 केली आहे. 31 डिसेंबर नंतर आयटीआर Income Tax भरल्यास 5,000 रुपये दंड द्यावा लागले. मात्र, टॅक्सपेयर्सची कमाई 5 लाख रुपयांच्या आत असेल तर लेट फाइन म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील.

हे वाचा – सलगर वस्ती पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध हातभट्टीवर धाड टाकून 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कोणत्या लोकांना द्यावी लागत नाही पेनल्टी

ज्याचे ग्रोस इन्कम बेसिक सूटच्या मर्यादेपेक्षा जास्त नाही, त्यांना आयटीआर फाइल करण्यात उशीर झाल्यास कोणतीही Income Tax पेनल्टी लागणार नाही. जर ग्रोस इन्कम सवलतीच्या बेसिक मर्यादेपेक्षा कमी असेल तर उशीराने रिटर्न फाइल करण्यावर सेक्शन 234F अंतर्गत कोणताही दंड लागणार नाही. (Income Tax Return File)

कसे फाईल करावे ITR (e-filing portal) :

जर तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन आपला टॅक्स रिटर्न Income Tax  फाइल  करायचा असेल तर तुम्ही या स्टेपच्या मदतीने भरूशकता – ऑनलाइन पद्धतीने प्राप्तीकर रिटर्न फाइल करण्यासाठी सर्वप्रथम प्राप्तीकरचे ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in वर व्हिजिट करा.

 यानंतर पोर्टलवर लॉगइन बटनवर क्लिक करा.

 यानंतर यूजरनेम नोंदवून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.

 पासवर्ड नोंदवा.

 यानंतर ई-फाईलच्या टॅबवर क्लिक करून फाईल इन्कम टॅक्स रिटर्नच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

 आता असेसमेंट ईयरचा पर्याय निवडून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.

 यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा ऑपशन येईल.

 ऑनलाइन ऑपशनवर क्लिक करून पुढे जा.

 या स्टेपनंतर दिलेले ऑपशन – इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (HUF) किंवा ऑदर्स पैकी इंडिव्हिज्युअल पर्याय निवडा.

 यानंतर कंटिन्यू टॅबवर क्लिक करा.

 या स्टेपनंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 पर्यायाची निवड करून प्रोसीडच्या पर्यायावर टॅबवर क्लिक करावे लागेल.

 यानंतर पुढील स्टेपमध्ये मूलभूत सूट मर्यादेच्या वर किंवा कलम 139 (1) अंतर्गत सातव्या तरतुदीमुळे आपला रिटर्न दाखल करण्याचे कारण विचारले जाईल.

 तुम्हाला हे ठरवावे लागेल की, ऑनलाइन आयटीआर दाखल करताना योग्य पर्याय निवडला आहे.

 या स्टेपनंतर बँक डिटेल नोंदवा.

 यानंतर तुमच्या समोर आयटीआर फाईल करण्यासाठी नवीन पेज उघडून समोर येईल.

 यानंतर तुम्हाला तुमचे आयटीआर व्हेरिफाय करून याची एक हार्डकॉपी प्राप्तीकर विभागाला पाठवावी लागेल.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews