fbpx
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई Income Tax – निवासी आणि व्यावसायिक बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका बांधकाम (Construction) उद्योग समूहाच्या मुंबई आणि नवी मुंबईतील मालमत्तांवर प्राप्तिकर (Income Tax) विभागाकडून छापे (Raid) घालण्यात आले. हा समूह मुख्यत्वे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. या शोधमोहिमेत सुमारे 30 संकुलांवर छापे (Income Tax) घालण्यात आले. या तपासादरम्यान या समूहाकडून कर चुकवण्यासाठी अवलंबलेले विविध प्रकार उघडकीला आले. विविध कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले आणि सदनिकांच्या विक्री व्यवहारातील रकमेचा भाग म्हणून सुमारे 100 कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम प्राप्त झाल्याचे दर्शवत असलेल्या आणि ज्यांचा समावेश नियमित खातेवहीच्या हिशोबात समाविष्ट नव्हता अशा पावत्या जप्त करण्यात आल्या. त्याच प्रकारे अशा व्यवहारांवर घेण्यात आलेल्या ऑन मनीच्या पावत्यांबाबतही फेरफार झाल्याचे आढळले. ग्राहकांना ऑन मनीच्या मूल्याची प्रॉमिसरी नोट देणे आणि सदनिकेची नोंदणी झाल्यावर या प्रॉमिसरी नोट नष्ट करणे अशा प्रकारच्या पद्धतींचा अवलंब या समूहाकडून होत होता.

हे वाचा – सिमेंटच्या दरांत मोठी वाढ; सर्वसामान्यांना घर बांधणे आता महागणार

          या बांधकामाच्या वेळी या झोपड्यांमधील मूळ भाडेकरुंना त्यांच्या जागा रिकामी करण्यासाठी त्याचबरोबर इतर व्यक्तींना झोपडीधारकांच्या जागा रिकामी करण्यामध्ये मदत केल्याबद्दल बेहिशोबी रोख रकमेचे चुकारे दिल्याचे आक्षेपार्ह पुरावे तपासादरम्यान सापडले आहेत. त्याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आणि अनियमिततांचे देखील पुरावे सापडले आहेत.

           प्राथमिक छाननीत असे दिसून आले की या समूहाने एका कंपनीत रोख रक्कम भरून कंपनीवर नियंत्रण राखण्याइतपत महत्त्वाचे समभाग प्राप्त केले होते. त्याच प्रकारे टीडीएस च्या तरतुदींच्या अनुपालनातही गैरव्यवहार आढळले आहेत. या समूहाने ज्या चुकाऱ्यांचे दावे केले आहेत त्यापैकी काही विशिष्ट व्यवहारांमध्ये टीडीएस कापलेलाच नाही आणि त्याचे एकूण मूल्य सुमारे 300 कोटी रुपये आहे. या तपासादरम्यान 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update