fbpx
incometax-finish-the-day

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

नवी दिल्ली Incometax – 31 डिसेंबर (31st December) येण्यास केवळ 7 दिवस शिल्लक आहेत आणि या उर्वरित 7 दिवसात सामान्य लोकांना आपली काही अतिशय महत्वाची कामे उरकावी लागतील. जर ठराविक तारखेपूर्वी ही कामे केली नाही तर नुकसान होऊ शकते. ईपीएफ अकाऊंट (EPF Account e nomination) मध्ये ई नॉमिनी नोंदवण्यापासून आयटीआर फाईल (ITR Filing Last Date) करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला कोणती कामे उरकायची आहेत. (31st December)

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 30 तर कोरोनाचे 7350 एक्टिव्ह रुग्ण

Income Tax Return फायलिंग

सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर रिटर्न (ITR रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि कोरोना विषाणूमुळे आलेल्या अडचणींमुळे मोदी सरकारने मुदत वाढवली होती. आता करदात्यांना त्यांचा आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत भरावा लागेल जेणेकरून ते दंड टाळू शकतील.

Important 2. हयातीचा दाखला (life certificate)
पेन्शनधारक असाल तर 31 डिसेंबरपर्यंत हयातीचा सादर करावा लागेल. पेन्शनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीचा दाचला सादर करावा, अन्यथा निवृत्ती वेतन मिळणे बंद होईल. वर्षातून एकदा पेन्शनधारकांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजेच हयातीचा दाखला 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावा लागतो, परंतु यावेळी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हयातीचा दाखला सादर केल्यावर पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे स्पष्ट होईल. (31st December)

Important 3. डीमॅट, ट्रेडिंग अकाऊंटचे KYC
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे केवायसी करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. डीमॅट, ट्रेडिंग खात्यात नाव, पत्ता, पॅन, वैध मोबाइल नंबर, वय, केवायसी अंतर्गत योग्य ईमेल आयडी अपडेट करणे आवश्यक आहे.

Important 4. आधार-UAN लिंक करणे (Aadhaar-UAN Linking)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना UAN क्रमांक आधारशी जोडणे आवश्यक आहे. UAN ला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. EPFO मेंबरसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास अडचणी येऊ शकतात, पीएफ खाते बंद होऊ शकते.

Important 5. कमी व्याजावर 31 डिसेंबरपर्यंत मिळेल होम लोन
तुम्ही बँक ऑफ बडोदा (BoB) चे ग्राहक असल्यास, तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्जाचा लाभ घेऊ शकता. सणासुदीच्या हंगामात, BoB ने गृहकर्जाचा दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, जो 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update