8
Covid 19 Health Solapur City

सिंहगड कोव्हिड सेंटरमध्ये मिळतोल निकृष्ठ दर्जेचे जेवण- नगरसेवक सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

■ प्रत्येक रुग्णांना उकडलेली अंडी न देता मक्तेदाराने केले अंडे गायब
डॉक्टरांना वेतन कपात केल्याने डॉक्टर गेले सुट्टीवर

सोलापूर- कोरोना रुणांच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण राज्यामध्ये आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर झालेय. तर सोलापूर जिल्ह्यातसुद्धा संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्या कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. सिंहगड कोव्हिड सेंटर्समध्ये एकूण आज 321 रुग्णांची संख्या असून तेथे प्रचंड अस्वच्छता, निकृष्ट दर्जेचे जेवण, पिण्याच्या पाण्याची फिल्टर खराब झाल्याने अस्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरणे आणि डॉक्टरची संख्या कमी झाली आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे वारंवार तक्रार लक्षात घेता नगरसेवक सुरेश पाटील यांनी शुक्रवारी दुपारी सिंहगड कॉलेजला भेट दिले व रुग्णांच्या तक्रारी जाणून घेतल्या. याप्रसंगी सहाय्यक नियंत्रण अधिकारी विक्रमसिंग पाटील, सुरेश बिद्री, उपस्थित होते.

                 मागील लॉकडाऊन पासून पालिका प्रशासन कोव्हिड सेंटरची दुरवस्था सुधारणा झाली असल्याचे आजवर नुकतेच थापा मारत असल्याचे चित्र दिसत आहे. आश्चर्यची बाब म्हणजे पालिका आयुक्तांनी व उपायुक्त एकदा कोरोना सेंटरला भेट देऊन पाहणी केले व पुन्हा रुग्ण वाढल्याने फिरकले नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कोव्हिड सेंटरचे व्यवस्थापक पालिका अतिरिक्त आयुक्त खोराटे व संबंधित अधिकाऱ्यांनी एकदाही सेंटरला भेट दिले नसल्याचे उघड झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी फक्त कागदोपत्री घोडे नाचवणे पसंद केले आहे. शासकीय इमारतीत बसून फक्त निधी कसे आणायचे यावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकदा जेवण देणाऱ्या सेंटरवर जेवणात आळी किंवा खराब जेवण मिळाल्याची तक्रार आली असली तरी त्या मक्तेदारावर आजवर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट बिल जास्त लावून पैसे लाटल्याचा प्रकार घडला आहे. जेवणासह उकडलेली अंडी ही रुग्णांना देण्याची मागणी असताना मक्तेदाराने फक्त जेवण देत 5 दिवसाला एकदा अंडी देणे किंवा तेही न देता बिल लावणे अशी फसवेगिरीची कामे सदर मक्तेदाराने केली आहे. अश्या मक्तेदाराला काळ्या यादीत टाका असे आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे. सोलापूर शहरातल्या सिंहगड कॉलेज येथे कोविड सेंटर असून याठिकाणी दररोज अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या सेंटरमध्ये जिकडेतिकडे अस्वच्छता पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने रुग्णांची तक्रार वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने अस्वच्छ पाणी रुग्णांना प्यावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फिल्टर होणाऱ्या मशिनमधून घाण न काढल्याने गढूळ पाणी येत असल्याची नागरिकांनी तक्रार केले.
                सोलापूर मनपाच्या वतीने मक्तेदारकडून प्रत्येक कोव्हिड सेंटरला जेवण पोहचवले जाते. परंतु निकृष्ट पद्धतीचे जेवण असल्याने रुग्णांवर उपवास बसण्याची वेळ आली आहे. रुग्णांना तपासण्यासाठी नियुक्त केलेल्या डॉक्टरांची वेतन कमी केल्याने संख्या कमी झाले आहे. कोरोना रुग्णांना तपासणीसाठी बदलणारे डॉक्टर जीव धोक्यात घालून माळरानातील सिंहगड कॉलेजला जात असतात. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने महिला डॉक्टरांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे तक्रार याप्रसंगी मांडले. कोरोनासारख्या महामारीत डॉक्टरांच्या वेतनातून कपात झाल्याने अनेक डॉक्टर सुट्टीवर गेले आहेत. या सर्व प्रकारामुळे या कोव्हिड सेंटरची परिस्थीत अतिशय विदारक झाली आहे. तशी व्यथा येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडली आहे. याप्रसंगी कोव्हिड सेंटर खाते प्रमुख इजाज मुजावर, डॉ. तानवडे, डॉ. करपे आदींची उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143