मुंबई- महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येचा वेग थोडा कमी झाला असला तरी मात्र, मृतकांचा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. तसेच आता लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळेच बाधितांच्या संख्येला ब्रेक लागू शकला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आता पुढील काही दिवस सुद्धा राज्यात कठोर निर्बंधल लागू करण्यात यावेत अशी भूमिक राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा – धक्कादायक! या शहरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही
कठोर निर्बंध आणखी 14 दिवस वाढणार
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. बहुतेक कॅबिनेट मंत्री यांनी सध्या सुरू असलेला राज्यातील लांकडाऊन कालावधी 14 दिवस वाढवावे अशी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री यांची भूमिका लांकाडऊन कालवधी वाढवावा अशीच भूमिका मांडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोरोना बाधितांची संख्या मुंबईत कमी होत आहे. पण राज्यातील इतर शहरांत अद्याप कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. यामुळे सध्याच्या लॉकडाऊन कालवाधी पुन्हा वाढवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दिले आहेत.