Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
नवी दिल्ली Central- केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील विधेयक आता संसदेत मांडले जाणार आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षांवरून वाढून २१ वर्षे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात यावरील आपले मत स्पष्ट केले होते. या विधेयकाला लवकरच संसदेत सादर केले जाईल आणि मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी बाल विवाह कायद्यात दुरुस्ती केली जाईल.
BSNL मध्ये मोठी मेगा भरती ; मोठ्या प्रमाणावर पगार मिळणार- BSNL RECRUTMENT 2021
Central बाल विवाहाला आळा घालण्यासाठी आणि बालिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी लग्नाच्या वयाची अट कायदेशीर करण्यात आली आहे. आतापर्यत कायद्यानुसार मुलींसाठी लग्नाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलांचे २१ वर्षे आहे.
मोदी सरकारने लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय का घेतला?
नरेंद्र मोदी सरकारने महिलांच्या लग्नासाठीच्या वयाचा पुनर्आढावा घेण्यामागे काही कारणे आहेत. यात लिंग समानता म्हणजे मुलगा आणि मुलीचे लग्नाचे वय सारखेच असावे हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर लग्न लवकर झाले म्हणजे गरोदरपणाचा मुद्दादेखील लवकर येतो. याचा परिणाम महिलांच्या आणि त्यांच्या अपत्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. बालमृत्यूवरदेखील याचा परिणाम होतो. लहान मुलांचे आरोग्य, त्यांच्याशी निगडीत मृत्यूदर यावर लग्नाच्या वयाचा परिणाम होतो. शिवाय महिलांना शिक्षणाची संधी मिळणे आणि लग्नानंतर करियर किंवा नोकरी-व्यवसाय करण्याची संधी मिळणे यासंदर्भातदेखील महिला सक्षमीकरणाचा मुद्दादेखील यात आहे. अलीडेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हे झाला त्यात म्हटले आहे की बालविवाहात थोडीच घट झाली आहे. २०१५-१६ मध्ये २७ टक्के असणारे हे प्रमाण २०१९-२० मद्ये २३ टक्क्यांवर आले आहे. सरकार यात आणखी घट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जगभरातील विविध Central देशांमध्ये लग्नासंबंधीचे वय वेगवेगळे आहेत. कोणत्या देशात काय अट आहे ते पाहूया.
संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेली आकडेवारी-
देश | महिला | पुरुष | Source Year |
अमेरिका | 18 | 18 | 2011 (अलग-अलग राज्य में अलग उम्र) |
इंग्लंड | 18 | 18 | 2011 |
ऑस्ट्रेलिया | 18 | 18 | 2011 |
बांग्लादेश | 18 | 21 | 2004 |
ब्राझिल | 18 | 18 | 2011 |
कॅनडा | 18 | 18 | 2011 |
चीन | 20 | 22 | 2011 (वेगवेगळ्या राज्यात वयाची अट वेगवेगळी असू शकते) |
इस्त्रायल | 17 | 17 | 2011 |
इटली | 18 | 18 | 2011 |
जपान | 20 | 20 | 2011 |
म्यानमार | 20 | 20 | 2011 |
नेपाळ | 20 | 20 | 2011 |
नेदरलॅंड | 18 | 18 | 2011 |
न्यूझीलॅंड | 18 | 18 | 2011 |
पाकिस्तान | 16 | 18 | 2013 |
रशिया | 18 | 18 | 2011 |
सिंगापूर | 21 | 21 | 2011 |
दक्षिण आफ्रीका | 21 | 21 | 2011 |
स्विट्जरलैंड | 18 | 18 | 2011 |
फ्रान्स | 18 | 18 | 2011 |
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews