Solapur City News 114
Fund Health

आमदार प्रणिती शिंदे यांच्या आवाहनास शिवभोजन मदतीसाठी सरसावले अनेक उद्योगपती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे साहेब यांनी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शिवभोजन योजनेतून गरजुंना शिवभोजन थाळी एक महिना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील शिवभोजनास भेट दिली असता सोलापूरामध्ये 1) अश्विनी हॉस्पिटल, सात रस्ता 2) श्री मार्कंडय रुग्णालय, दत्त नगर, 3) रामवाडी, रामवाडी दवाखान्याजवळ, 4) एस.टी. स्टॅन्ड आवार, 5) एस.टी. स्टॅन्ड समोर, 6) मार्केट यार्ड इ. शिवभोजन केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये 250 थाळी देण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. सदरचे थाळी गोर-गरीब व गरजू लोकांना कमी पडत असल्यामुळे थाळी वाढविण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील उद्योगपती यांना शिवभोजनास मदत करण्याचे आवाहन केले.

सोलापूरातील उद्योगपती यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद देवून, शिवभोजनच्या वाढत्या मागणीची पुर्तता करण्यासाठी पुष्पा टेक्सटाईल्स, रिसबूड परिवार, चव्हाण समूह, राका परिवार यांच्यावतीने तांदुळ, गहु, डाळ, तेल आदी. साहित्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे शिवभोजनामध्ये थाळी वाढल्यामुळे सोलापूरातील गोर-गरीब जनेतला याचा लाभ मिळेल.

आमदार प्रणिती शिंदे यांनी या सर्वांचे आभार मानत आपल्या एका आवाहनास मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच अजून ही शक्य तेवढी मदत कार्य करण्याचे सूतोवाच केले, लोकसहभागातून आपण सर्व कोरोनावर नक्कीच लवकर मात करू असा विश्वास ही आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी पदम राका, रमेश डाकलिया, राजेश देढीया, शिवप्रकाश चव्हाण, जितेंद्र राठी व संदिप जव्हेरी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com