fbpx
jitendra avhad solapur city news
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- कोरोना महामारीच्या संकटकाळात गृहनिर्माण विभागातर्फे बांधकाम व्यावसायिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग करून राज्यातील गोरगरिबांना घरांचा लाभ देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावाशासनास सहकार्य करावे. गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले. परळच्या हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे दैनिक लोकसत्ताने आयोजित केलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातनगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

गृहनिर्माण मंत्री आव्हाड म्हणालेमुंबई व आसपासच्या परिसरात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत कामांना गती देण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया अधिक सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. अशा परिस्थितीत जर विकासक प्रकल्पाचे काम सुरू करणार नसेल तर असे प्रकल्प म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ताब्यात घेऊन स्वतः पुनर्विकास करेल असे त्यांनी स्पष्ट केले. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम आता प्रत्यक्ष सुरू झालेले आहे.बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न होता. तोही सोडविण्यात आला आहे. २००७ पासून प्रलंबित असलेला गोरेगाव पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागला असून मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळाली आहे. पुढील महिन्यात त्याचे काम सुरू होईल. पत्राचाळीतील ६७२ मूळ रहिवासी बाहेर असून त्यांच्यासाठी आधी पुनर्वसन इमारत बांधण्यात येईल अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

हे वाचासिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

म्हाडा अभिन्यासांचा एकत्रित पुनर्विकास

म्हाडा वसाहतींचे मुंबईत 56 अभिन्यास आहेत. यापैकी बहुतेक अभिन्यास एकत्रितरीत्या विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.याचा फायदा रहिवासी आणि विकासकांनाही होणार आहे. मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व दुरुस्ती मंडळाने पुनर्रचित इमारतींचा जलद गतीने पुनर्विकास करण्यासाठी तसेच समूह पुनर्विकास योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावली 33(7) व 33(9) मधील तरतुदीमध्ये अनेक  सुधारणा करण्यात आल्या आहेत असे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

म्हाडा कर्ज उभारणार

म्हाडाचे गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 20 ते 22 हजार कोटीं रुपयांचे कर्ज काढण्याचा शासनाचा विचार आहे अशी माहितीही मंत्री डॉ.आव्हाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

एम एम आर क्षेत्रासाठी स्वतंत्र प्राधिकरण

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील एकूण सात महानगरपालिका व आठ नगरपालिका क्षेत्रामध्ये (मुंबई वगळता) एकच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा  निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे मुंबईप्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन होऊन त्यांना पुनर्वसन सदनिका मिळणार आहे.

स्ट्रेस फंड उभारणार

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बांधकाम उद्योग संकटात आहे.अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी,गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्यासाठी व रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी स्ट्रेस फंड उभारण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहितीही मंत्री आव्हाड यांनी दिली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेकोरोनाच्या संकट काळातही राज्य सरकारचे काम थांबलेले नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने चांगले काम  केले आहे.नवी मुंबई विमानतळमेट्रो रेल्वेसागरी सेतूसमृद्धी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांचे काम वेगाने सुरू असून  विकासाच्या दृष्टीने ते मैलाचे दगड ठरणार आहेत. स्टॅम्प ड्युटीत सहा महिन्यांची सूट देण्यात आली.त्याचा नागरिकांना आणि व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाला आणि रोजगार निर्मितीही झाली. प्रशासनात पारदर्शकता व गतिमान कारभार यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.जवळपास आठ दशकांनतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. ८अ आता ऑनलाईन मिळत आहे.रेराखाली व्यावसायिकांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update