Health Maharashtra

महाराष्ट्रात गुरुवारी एकूण 568 जणांचा बळी, 67,013 रुग्ण; विदर्भात 259, मराठवाड्यात 166 कोरोनाने मृत्यू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

महाराष्ट्र- राज्यात गुरुवारी कोरोनाचे ६७,०१३ नवे रुग्ण आढळले. यातील १५,७३२ विदर्भातील तर मराठवाड्यातील ७८०० रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात विदर्भाचे २५९ आणि मराठवाड्याचे १६६ रुग्ण आहेत. मराठवाड्यात ७८०० पॉझिटिव्ह, १६६ मृत्यू : मराठवाड्यात गुरुवारी ७८०० रुग्ण, १६६ मृत्यू झाले. ७१ हजार ०५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संख्या अशी : औरंगाबाद १४५८ (३०), जालना ५५१ (१०), परभणी १२२० (१९), हिंगोली ३३९ (६), नांदेड १०९९ (२७), लातूर १२६९ (३८), उस्मानाबाद ७१९ (२१), बीड ११४५ (२१ मृत्यू).

विदर्भात रुग्णवाढीचा वेग थांबेना, १५ हजार नवे रुग्ण
अमरावती मधील विदर्भात कोरोनामुळे गुरुवारी २५९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५ हजार ७३२ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील १८५ जणांमध्ये नागपूरच्या ११०, चंद्रपूर ३८, गाेंदिया २३, भंडारा १४, वर्धा ९ तर गडचिराेलीच्या एकाचा समावेश आहे. प. विदर्भात ७४ जणांचा मृत्यू झाला. यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३७ तर अमरावती २३, अकाेला १०, बुलडाणा ३ तर वाशीम जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. नागपूर विभागात ११,७९९, तर अमरावती विभागात ३९३३ नवे रुग्ण आढळले. विदर्भात एकूण रुग्ण ७ लाख ३९ हजार ७६ वर पोहोचले, तर मृतांची संख्या १२ हजार ८७ झाली. आतापर्यंत ५ लाख ८३ हजार ४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com