fbpx
1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 टक्के पाण्याची झाली बचत

बापरे!! आज उजनी जलसाठ्यात 68.28% पाणी शिल्लक

सोलापूर- जोडभावी पेठ हद्दीत गेल्या चार महिन्यांपासून पाण्याचा वापर जास्त होत असल्याने रस्त्यावरील वाहनांचे अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रभाग 3 मधिल गोलचावडी परिसरात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांना कळली होती. याबाबत पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन तक्रारी जाणून घेतले.
                       स्मार्ट सिटीच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी घरामध्ये जोडणी न केल्याने वाया जात असल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटीतील कामांमध्ये मीटर बसवणे गरजेचे असताना या भागातील एकही नागरिकांच्या घरी मीटर नसल्याचे आढळून आले. एकीकडे उजनी 100 टक्के भरून ही सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होत नसून दुसरीकडे स्मार्ट सिटी भागात अनेक बोगस नळ कनेक्शन देऊन पाईप बाहेर सोडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. काही दिवसातच उन्हाळा सुरू झाला की हद्दवाढ भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु दिवसेंदिवस उजनी साठ्यात पाण्याची पातळी कमी झाली तर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. गोलचावडी परिसरात पाण्याचा अपव्यव वापर होत असल्याने अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त सुनिल माने, स्मार्ट सिटी व संबंधित पिएचई खात्याचे संजय धनशेट्टी, पाणीपुरवठा अधिकारी उस्तुरगी, विभागीय अधिकारी सुनिल लामकाने, एई बाळासाहेब भोसले, जेई मुंढेवाडी, अंजली कोने आदींनी भागाची पाहणी करून स्मार्ट सिटीस याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रसंगी माजी परिवहन समिती सदस्य शंभू वडलाकोंडा, विजय मद्दा, भारतीय जनता पक्षाचे शहर महिला अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, ओंकार तांडुरे, लक्ष्मीकांत गड्डम आदींची उपस्थिती होती.

_________________________________________________________________

शहरातील स्मार्ट सिटीच्या एबीडी भागातील निकृष्ठ दर्जेच्या रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज व पाण्याचे काम चांगल्या दर्जेच्या झाले पाहिजे. स्मार्टसिटीच्या नावाखाली खराब रस्ते, अपूर्ण ड्रेनेज कनेक्शन, दिवाबत्ती झाले आहे. स्मार्ट सिटीतील कामांमध्ये डिपीआर प्रमाणे काम होते की नाही याबाबत संपुर्ण चौकशी लावणार असून गोलचावडी परिसरासह संपूर्ण शहरातील कामांची पाहणी करून निकृष्ट असेल तर पालिका आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करावे. कामांबाबत कुठे भ्रष्टचार झाला असेल सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदनाम होत असेल तर भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही.-
सुरेश पाटील, नगरसेवक प्रभाग 3

स्मार्ट सिटीचे काम छान झाले आहे परंतु पाण्याच्या दिवशी घरालगत व दुकानासमोर उतार केल्याने पाणी साचत आहे. पण पावसाळ्यात असेच पाणी उभारल्यानंतर आम्ही जगायचे कसे ? लवकरात लवकर यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावा-
शंकर सुरवसे-नागरिक

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update