Maharashtra

नीलमताई गोऱ्हे यांनी केली अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची पाहणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नांदगाव, कंकवाडी व कोंढरी गावांची व शेतीची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून करीत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती घेत ग्रामस्थांकडून स्थानिक परिस्थितीबाबत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, नांदगावचे सरपंच युवराज कुडले, कंकवाडीचे सरपंच मुक्ताबाई पवार, कोंढरीचे सरपंच भारती कोंढाळकर यांच्यासमवेत संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नांदगाव, कंकवाडी, कोंढारी येथे शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या पंचनाम्याची माहिती घेतली. त्यांनी अतिवृष्टीमुळे ज्या घरांचे, शेतीचे नुकसान झाले त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करणाच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यांनी संबंधिताना दिल्या.

कंकवाडी गावातील झालेल्या शाळेच्या इमारतीच्या नुकसानीची पाहणी करत शाळेतील पुस्तके, संगणके यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणी करीता तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले. कोंढरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू घाबरु नका, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे, ग्रामस्थांना दिला आधार. कोंढरी ग्रामपंचायतने पुनवर्सनाबाबतत ग्रामसभा घेवून शासनाकडे ठराव सादर करावा. त्यादृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करून पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ग्रामस्थांना दिले. कोंढरी गावातील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी करत गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालानुसार दरवर्षी दरड कोसळण्याच्या कारणांचा शोध घेणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com