Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
वाडिया हॉस्पिटलला 100 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय
सोलापूर- आमदार प्रणिती शिंदे यांनी फॉरेस्ट येथील वाडिया हॉस्पिटल मधील कोव्हिड-19 कॉरंटाईन सेंटर येथे जावून पाहणी केली. गेल्या महिन्यापासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कोव्हिड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोलापूरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे.
त्यामुळे आतापर्यंत तेथे लक्षणे नसणाऱ्या कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या उपचाराची तेथे सोय करण्यात येत होती. परंतू सोलापूरात लक्षणे असणारे व तसेच गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे सोलापूरातील सर्व हॉस्टिपलमध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे वाडिया हॉस्पिटलमध्ये 100 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय या पाहणीदरम्यान घेण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, शहर अभियंता संदिप कारंजे व इतर अधिकारी उपस्थित होते.