Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर International – मूळचे सोलापूर येथील, संदीप अनिल डोंगरे हे पुण्यातील कॉलेज मध्ये माध्यम अभ्यास विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. यांनी अध्यापना सोबतच ‘कलर्स ऑफ मिस्ट्री’ हा लघुपट बनवला. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या चौथ्या ‘मेईहोडो इंटरनॅशनल युथ व्हिज्युअल मीडिया फेस्टिव्हल’ या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेमध्ये लघुपटाची निवड झाली आहे.
खड्डा तालीमच्या वतीने यंदाच्या वर्षी होणार 51 शिवमूर्तीचे वितरण:-नगरसेवक सुनील कामाठी
स्पर्धेमध्ये जगभरातील विविध देशांतून International लघुपट पाठवले जातात. पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत कदम यांच्या चित्रांवर आणि त्यांच्या चित्रांच्या प्रवासाबद्दल ९ मिनिटांचा लघुपट आहे. या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन, छायाचित्रण आणि संकलन संदीप डोंगरे यांनी केले आहे. चित्र निर्मितीमध्ये निसर्गातून नेमकी काय प्रेरणा मिळते, अमूर्त चित्र शैलीत नेमकी काय प्रेरणा असते, निसर्गाशी चित्रकार कसा एकरूप होऊन जगत असतो आणि त्याचा प्रभाव चित्रांवर कसा पडतो, या विषयीचा हा लघुपट आहे. हा लघुपट इंग्रजी भाषेत आहे. या आधी संदीप डोंगरे यांनी ‘द गोल्डन वूमन’ नावाचा लघुपट बनवला होता. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. चित्रकलेचं व्यावसायिक शिक्षण घेत असल्यापासून चित्रपटांची आवड निर्माण झाली. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागात शिकत असताना, सिनेमा माध्यमाविषयी शिकता आले. तिथून हा प्रवास सुरू झाल्याचे संदीप डोंगरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासोबतच स्वतःच लघुपट निर्मिती कार्य सुरू ठेवले आहे, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या या कामातून प्रेरणा देखील मिळत आहे.
या लघुचित्रपटाला मिळालेले पुरस्कार
१ इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल स्पेशल ज्युरी अवॉर्ड ः बेस्ट डिरेक्टर
२ गोल्डन लीफ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल स्पेशल मेन्शन अवॉर्ड ः बेस्ट डिरेक्टर
३ गोल्डन स्पॅरो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल बेस्ट सिनेमेटोग्राफी अवॉर्ड ः संदीप अनिल डोंगरे
४ पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल बेस्ट कन्सेप्ट अवॉर्ड ः शॉर्ट फिल्म
५ गोल्डन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews