Maharashtra Solapur City

बापरे! या भागात पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत; अमृत योजनेच्या बेजबाबदार कामामुळे नगरसेवक वैतागले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर शहरात पाणी टंचाई असताना भवानी पेठेतील कुंभरवेस भागात चार इंची पिण्याच्या पाण्याचे लाईन फुटून लाखो लिटर पाणी ड्रेनेज मध्ये गेले. गेल्या दोन महिन्यांपासून अमृत योजनेमार्फत सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी निकृष्ट दर्जेचे काम सुरू असून या भागात महापालिकेचे एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने ही बाब घडल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांनी तक्रार केले होते. 

यानंतर सायंकाळी 5 वाजता कुंभारवेस येथील अजंठा वाइन शॉप जवळ पाण्याची चार इंची लाईन फुटल्याचे कळताच नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक सुरेश पाटील, भाजप सरचिटणीस शशी थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्त करण्यास सांगितले. जोडभावी पेठ, मुनाळे बोळ, चाटी गल्ली, सोना नगर आदी भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

         परंतु घटना घडल्यावरच अधिकाऱ्यांना जाग येणार का ? वेळे अभावी उशिरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची कुचंबना नक्की होणार. या अमृत योजनेअंतर्गत कामासाठी वर्क ऑर्डर दिल्यापासून आतागायात पालिकेच्या वस्तू व पाणीपुरावठ्याची मोठे नुकसान केले आहे. या सर्वप्रकरणावर कारवाई होणार का असे प्रश्न नागरिक करत आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143