Job Maharashtra

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला ‘जल जीवन मिशन’चा आढावा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात र्व ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत आराखड्याबाबत  बैठक घेण्यात आली. राज्यातील सजिल्ह्यांमध्ये  जिल्हा कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन आराखडा राज्यस्तरावर सादर करावा, ‘जल जीवन मिशन’च्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्ह्यांना विस्तृत सूचना देणे, पुनर्जोडणी करावयाच्या योजना, प्रगतीपथावरील योजना व प्रशासकीय मान्यता दिलेल्या परंतु कार्यादेश न दिलेल्या योजना याबाबत जिल्ह्याकडून प्राप्त झालेली माहिती याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, ‘जल जीवन मिशन’च्या संचालक श्रीमती आर. विमला व अन्य अधिकारी  उपस्थित होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठीही मंत्री  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मंत्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगून पदोन्नती व इतर अनुषंगिक बाबींवर कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील असे कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले. प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करणे, अभियंत्यांच्या पदोन्नतीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, सामान्य प्रशासन विभागाकडे प्रलंबित प्रश्न सोडवणे, रजा वेतन अंशदान, रिक्त पदांचा आढावा, निवृत्ती वेतनाचे प्रश्न याबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्‍न सकारात्मक दृष्टीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143