Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई Job – ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेस ही मान्यता दिली. ठाणे महानगरपालिकेने या संदर्भात आपत्ती प्रतिसाद पथकात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला होता.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करा जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे आवाहन
Job ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शासनाने ८८० पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली होती. त्यामध्ये मुख्यतः आरोग्य विभागातील पदे होती, मात्र आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद पथकातील पदांचा समावेश नव्हता. Job आता आपत्ती प्रतिसाद पथकामध्ये वर्ग दोनचे एक पद कमांडंट तसेच वर्ग तीनची डेप्युटी कमांडंटची तीन पदे आणि प्रतिसादकांची (रिस्पॉडंर) ७५ पदे अशी ७९ पदे निर्माण केली जातील. यासाठी महानगरपालिकेस ४.६४ कोटी खर्च येईल.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143