Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नागपूर Job – राज्यात खनिज आधारित नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाने राज्याच्या विविध भागात खनिज साठ्यांचा व्यापक स्वरुपात शोध घ्या तसेच त्या क्षेत्रात रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे आदेश बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसनिमित्त सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात महाआरती
Job आमदार ॲङ आशिष जयस्वाल, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाच्या संचालक अंजली नगरकर, उपसंचालक डॉ. एस. पी. आवळे (नागपूर), सुरेश नैताम (चंद्रपूर), प्रशांत कोरे (औरंगाबाद) यांच्यासह संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. खनिज आधारित नवीन उद्योग सुरु होण्यासोबतच अस्तित्वात असलेल्या उद्योगांना आवश्यक खनिज साठे उपलब्ध करून देण्यासाठी खनिजांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात खनिज सर्वेक्षण आणि पूर्वेक्षण कार्यक्रम हाती घ्यावा. मुबलक खनिजसाठा उपलब्ध असलेल्या परिसरातच नवीन उद्योग सुरु झाल्यास तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवू शकेल, असे भुसे यावेळी म्हणाले. तसेच खनिज उत्खननासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीमधून खाणबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी आरोग्य आणि शिक्षण विषयक सुविधानिर्मितीवर विशेष भर देणे आवश्यक आहे. Job खाणींमुळे बाधित नागरिक, गावांची यादी बनवून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा उपयोग व्हावा. जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत जमा होणाऱ्या निधीचा विनियोग प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेकरिता करावयाचा असून त्यातून पिण्याचे पाणी, प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला व बाल कल्याण, वयोवृध्द व दिव्यांग कल्याण तसेच कौशल्य विकास आदी बाबींवर खर्च करावा. Job खाणबाधित क्षेत्रात रस्ते, पूल, जलसंधारण, पर्यावरणाचा समतोल इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात. सर्व जिल्ह्यांमध्ये खाणींमुळे बाधित नागरिकांची अद्ययावत यादी तयार करून त्यानुसार लाभ दिले जावेत, असे भुसे यांनी सांगितले.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143