Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर JOB – उद्योग क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या कौशल्य आधारित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करत असताना कृषी क्षेत्रातील कौशल्य असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करावी व यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सोलापूर व लोकमंगल फाऊंडेशन आणि वर्कफोर्स सेंटर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते.
हे वाचा – जीएसटी विभागाच्या कारवाईत 161 कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक
JOB यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनोज बिडकर, लोकमंगल फाऊंडेशनचे संचालक मनिष देशमुख, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सहायक आयुक्त सचिन जाधव, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केल्यास या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच ज्या उमेदवारांना स्वयंरोजगार करावयाचा आहे अशांना सर्व शासकीय महामंडळांनी मार्गदर्शन करावे व त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय स्थापन करण्यास प्रोत्साहित करावे तसेच स्वयंरोजगार सुरू करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करावे ,अशा सूचना त्यांनी दिल्या. आजच्या रोजगार मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित आहेत, त्याच प्रमाणे विविध कंपन्यांनीही सहभाग घेतलेला आहे. JOB या ठिकाणी रोजगार बरोबरच स्वयंरोजगाराची ही माहिती दिली जाणार असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराची माहिती घ्यावी. शासनाकडून अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीचा लाभ घेऊन संबंधित विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. तसेच कंपनीमध्ये नियुक्ती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा व ज्या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल त्या ठिकाणी जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी सूचित केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती प्राचार्य बिडकर यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे उपक्रम देखील राबविण्यात येत असल्याचे सांगितले. JOB सोलापूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात वाढत असून या वसाहतीमधील कंपन्यांना जे कौशल्य असलेले मनुष्यबळ आवश्यक असते त्या त्या कौशल्याचे प्रशिक्षण देखील आपण नव्याने सुरू करण्यास तयार आहोत. परंतु संबंधित कंपन्यांनी आमच्याशी संपर्कात राहून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.
एकूण सहभागी उमेदवार – 1288
एकूण रिक्तपदे – 802
एकूण सहभागी उद्योजक – 27
एकूण उमेदवारांनी मुलाखती दिल्या – 1013
एकूण उमेदवारांची प्राथमिक निवड – 366
स्वयंरोजगाराच्या बाबत विविध कर्ज योजना व व्यवसाय / उद्योगसंदर्भात मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतलेले एकूण उमेदवार – 224
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143