fbpx
job The great boom of youth

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

अखेर एस आर पी एफ पोलीस पदावर नोकरी करायची संधी मिळाली

घोंगडे वस्तीच्या गरीब कुटुंबातील मुलगा झाला एस आर पी एफ पोलीस

सोलापूर Job – लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी अंगी बाळगल्यास भविष्यातील अडचणी दूर होतात. असेच काही स्वप्न बाळगलेल्या भवानी पेठेतील किरण कंटीकर हा तरुण वयाच्या 24 व्या वर्षांपासून जनतेच्या सेवेसाठी म्हणून पोलीस व्हायचे स्वप्न अंगी बाळगला होता. अखेर डिसेंबर मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत पास होऊन आता ट्रेनिंगसाठी सज्ज आहे. लहानपणापासून अनेक खडतर दिवस काढून आपले शिक्षण दहावी उत्तीर्ण होऊन NCC च्या अनेक सन्मानपत्रिका घेत उत्तुंग भरारी घेतली आहे. तसेच पुढील महाविद्यालयातील शिक्षण सुरू ठेवत भरतीसाठी सराव सुध्दा चालू ठेवली होती. गेल्या कोव्हिड 19 मध्ये जनसेवेसाठी म्हणून कोव्हिड काळात मोफत पोलिसांसह सेवा बजावत आपले कर्तव्य पार पाडले.

मुस्लिम समाजाबद्दल चुकीची पोस्ट टाकणाऱ्यावर कड़क कारवाई करा; प्रहारची पोलिस आयुक्तांकडे मागणी

             आपल्या भागातील गरीब विद्यार्थी Job अखेर भरती प्रक्रियेत पास झाल्याने भवानीपेठेतील नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्याच्या उत्तीर्णने सत्कार समारंभ ठेवले होते. वडिलांच्या डोळ्याला दिसत नसल्याने एका मुलाने सरकारी नोकरीत आपले स्वप्न साकार केले आहे याचा आम्हाला आनंद झाला आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या समाजाचा मुलगा पोलीस झाला याचा आनंद व्यक्त करत मोठ्या थाटात सत्कार समारंभ केले. आगोदर होमगार्ड म्हणून काम करत नंतर कोरोना काळात कोव्हिड काळात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. यानंतर भरतीत srpf पोलीस अहमदनगर येथे पास झाल्याने सर्वत्र आनंदाने कौतुकांचे वर्षाव होत आहे. असेच पुढे जाऊन मोठ्या पदावर ऑफिसर व्हावे अशी अपेक्षा नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भागातील जेष्ठ मंडळी, मित्र परिवाराने कौतुक केले. यावेळी श्रीशैल कंटीकर स्वामी व सिद्रामय्या पुराणिक यांच्या हस्ते शाल व हार घालून सत्कार करण्यात आले. यावेळी शरणप्पा डोळे, नागनाथ मलूरे, लगमन्ना यलदद्दी, निंगप्पा पुजारी, बसवराज भाईकट्टी, किसन बत्तीन, अब्बासअली तांबोळी, नर्सप्पा मंदकल, बंडप्पा डोळे, दशरथ गंजेली, बसवराज जाटगल, पांडुरंग कैरमकोंडा, नागनाथ मंदकल, सुरेश गोरकल, सुरेश झेंडेकर, बतलय्या माचरला, सायबण्णा मुडल, अप्पू उळागड्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा करण्यात आले.

job The great boom of youth
                  या सत्कार प्रसंगी बोलताना किरण कंटीकर म्हणाले की, मी लहान पणापासूनच भरतीसाठी Job प्रयत्न करत असून अनेक अडचणीला सामोरे जात कठीण प्रसंगाला तोंड दिले आहे. माझ्यासारखे स्वप्न बाळगून इतर मित्र मंडळीने सुद्धा सरकारी नोकरी मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केले. याप्रसंगी भागातील भीमाशंकर कंटीकर, शरणू तेग्गेळी, निंगप्पा मोलनकल, अशोक जेनुरे, मल्लिनाथ कोळी, अप्पा शहापूरे, बिपीन पाटील, यल्लपा कर्ली, विजय पुजारी, शिरशीकर, दत्तात्रय डबरे, मल्लिनाथ चोपडे, इकबाल नालवार, अब्बास कोसगीकर, शफिक शेख, नितीन शेजुळ, तमण्णा कंटीकर व भागातील नागरिकांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update