karthiki-ekadashi-on-pandhari
Religious Solapur City

कार्तिकी एकदशीसाठी रेल्वेची चाके धावणार पंढरीला

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर एसटी कामगारांचा संप आहे. त्यामुळे लालपरीला ब्रेक लागला आहे. ऐन सनासुदीत कामगारांनी संप केल्यांने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर आगामी कार्तिकी यात्रेत देखील प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी प्रवासी गाड्यांची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभुमीवर रेल्वेने मात्र कार्तिकीसाठी पंढरपूरला  येणाऱ्या भाविकांसाठी 7 नव्या रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.

          कोरोनाच्या महामारीत राज्यात कोणत्याही मोठ्या यात्रेला परवानगी नव्हती. मात्र यंदा सर्वत्र मंदिरे सुरू झाली आहेत. त्यातच पंढरपूर कार्तिकी यात्रेलाही सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, वारीसाठी रेल्वेने 50 हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात येतील असा अंदाज रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे 7 नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

हे वाचा – विकासकामांना गती देण्यासाठी कोरोना नियंत्रणात असणे आवश्यक; नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा

           ऐन कार्तिकीच्या तोंडावर एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहणार असल्याने वारीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केच वारी भरेल अशी शक्‍यता आहे. तर, यात्रेदरम्यान रेल्वेवर वारकऱ्यांचा अधिकचा भार पडणार हे गृहीत धरुन रेल्वे विभागानेही तयारी पूर्ण केलीय. तिकीट आरक्षणाच्या आणखी 4 खिडक्‍या सुरु केल्या आहेत. रेल्वेस्थानकात पिण्याचे पाणी, दवाखान्याची सोय केलीय. शिवाय स्वच्छतेसाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलीय. दरम्यान, कार्तिकी यात्रेसाठी लातूर -पंढरपूर, मिरज -पंढरपूर, लातूर – मिरज, मिरज- लातूर, बिदर- पंढरपूर-मिरज, अदिलाबाद- पंढरपूर, नांदेड- पंढरपूर व सांगली -पंढरपूर या नव्या गाड्या करण्यात आल्या आहेत.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews