fbpx
default शासनाकडून प्रतिकुटुंब १० किलो गहू- तांदूळ व ५ लिटर केरोसिन मिळणार मोफत
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई, दि. 19 : महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार  शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे अश्या निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण  मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून प्रतिकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.  राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ०८ मार्च २०१९ च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती  भुजबळ यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM शासनाकडून प्रतिकुटुंब १० किलो गहू- तांदूळ व ५ लिटर केरोसिन मिळणार मोफत

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update