IMG 20210508 WA0015
Maharashtra Solapur City

खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुलभ व्हावा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिल्या सूचना

IMG 20210508 WA0014

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ३ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्र खरीप पिकाखाली येते. त्यानुषंगाने येत्या खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणींपासून वाचविण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. येणारा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुलभ व्हावा यासाठी निवेदन देत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सूचना केल्या. शनिवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेत कोरोनासह खरिप पूर्व हंगाम नियोजनाबाबत चर्चा केली. कोरोनाच्या संकट काळात आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना योग्य दारातच गुणवत्तापूर्ण खते, बी-बियाणे मिळावीत. गतवर्षी शेतकऱ्यांनी खरेदी केलेले महाबीजचे बियाणे मोठ्या प्रमाणात उगविले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात बसल्याने याची यंदा काळजी घ्यावी, असे निवेदन दिले.

              तसेच खरीपपूर्व पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात. शेतकऱ्यांना सर्व सुविधा सुलभ उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक व मानसिक त्रास होणार नाही याबाबत कृषी विभागाने सतर्क राहावे. मागेल त्याला शेततळे, वीज जोडणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आदी योजना पुन्हा पूर्ववत कार्यान्वित व्हाव्यात असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com