Kirit Somaiya exposed the BJP's scam
Crime Solapur City

किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला- प्रकाश वाले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पवार कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले हे करत असतानाच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेतील कोविड काळात 40 मृतदेह लपवण्याचा घोटाळयाची चौकशी सुरू आहे तसेच आरोग्य समितीतील कोट्यवधीचा घोटाळा हे पुढचे लक्ष असेल असे सांगितले त्याच पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख महापौर श्रीकांचना यन्नम यांची उपस्थिती होती.

हे वाचादक्षिण पश्चिम रेल्वेतील सोलापूर जिल्ह्याचा भाग मध्य रेल्वेत समाविष्ट करा – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

        सोमवारी सर्व वर्तमानपत्रात या बातम्या छापून आल्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आपल्या काँग्रेस भवनात या विषयी बोलताना म्हणाले की अरे वा हा तर भाजपचा सत्तेतील घोटाळा आहे, किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा पाठपुरावा निश्चित करावा त्यांना लोक दुवा देतील. भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे, मग या भ्रष्टाचाराला भाजपचे पदाधिकारी जबाबदार नाहीत का? सोमय्या यांनी पुन्हा सोलापुरात यावे आणि या विषयाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करावा अशी अपेक्षा प्रकाश वाले यांनी व्यक्त केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143