Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Lampi- जिल्ह्यात लंपी आजाराने शुक्रवारी (दि.30) चार गाईचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. सांगोला तालुक्यातील वाढेगाव, मिसाळवाडी आणि धायटी येथील प्रत्येकी एक तर तालुक्यातील कचरेवाडी येतील एका गाईचा मृत्यू झाला. जिल्ह्यात लंपी आजाराने आतापर्यंत 17 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 गाई आणि सात बैलांचा समावेश आहे.
मृत झालेले Lampi जनावरे तालुकानिहाय खालीलप्रमाणे
1) माळशिरस- 3 बैल व 1 गाय असे एकूण 4, गावाची नावे-प्रत्येकी 1 बैल तिरवंडी व 2 बैल
शिंदेवाडी,आणि 1 गाय कचरेवाडी
2) सांगोला- 5 गाय, गावाची नावे – प्रत्येकी 1 याप्रमाणे शिवणे , महुद, धायटी, मिसाळवाडी, वाढेगाव
3) पंढरपूर- 1 गाय ,गावाचे नाव – कान्हापुरी
4) माढा – 1 बैल, गावाचे नाव – चौबे पिंपरी
5) करमाळा- 2 गाय , गावाची नावे – सावडी व राजुरी
6) उत्तर सोलापूर – 1 गाय, 3 बैल एकूण 4 जनावरे, गावाची नावे – 1 बैल कवठे, 1बैल बेलाटी, 1बैल
देगांव आणि 1 गाय (बसवेश्वरनगर) देगांव.
पशुपालकांनी Lampi घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यास पशु वैद्यकीय दवाखान्यात त्वरित दाखवून घ्यावे. तसेच जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143