land to Koyna project victims
Economy Maharashtra

कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटपाची कार्यवाही तात्काळ करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई- कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा-या पर्यायी जमिनींबाबत सातारा, सागंली, सोलापूर, रायगड, ठाणे तसेच पालघर या जिल्हा प्रशासनांनी पात्र लाभार्थ्यांना मान्य असलेली जागा वाटपाची कार्यवाही तात्काळ करावी, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

सोलापूरात रांगोळीतून साकारले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

                 सह्याद्री अतिथीगृह येथे कोयना प्रकल्प पुनर्वसनाचा आढावा बैठक आज झाली. या बैठकीत वडेट्टीवार बोलत होते. मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा-या पर्यायी जमिनींबाबत सातारा,सागंली, सोलापूर,रायगड, ठाणे तसेच पालघर या जिल्ह्यांनी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात तसेच प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या जमिनींचे वर्गीकरण करावे.जेणेकरून लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल.तसेच ज्या ठिकाणी जमिन उपलब्ध नाही अथवा काही अडचण असेल अशा ठिकाणांबाबत प्रस्ताव विभागाकडे पाठवावा जेणेकरून त्यावरती तात्काळ कार्यवाही करता येईल.ज्या जमिनींचे वाटप करताना प्रत्येक जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे तपासणी करावी अशा सूचना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या. यावेळी मदत व पुनर्वसनचे प्रधानसचिव असीम गुप्ता, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील, कोकण पुनर्वसन विभागाचे आयुक्त पंकज देवरे, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख, अपर जिल्हाधिकारी पालघर दिलीप गुट्टे, रायगड अमोल यादव,सांगली डॉ.स्वाती देशमुख,रत्नागिरी संजय शिंदे,ठाणे वैदही रानडे यावेळी उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com