fbpx
Landslide Measures recurrence

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

चंद्रपूर Landslide – घुग्‍गुस येथे झालेली भूस्‍खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्‍हा घडू नये, यादृष्‍टीने प्रभावी उपाययोजना करण्‍याचा कसोशीने प्रयत्‍न करण्‍यात येईल, अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भूस्खलनाच्या घटनेत स्‍थलांतरित  कुटुंबांसाठी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्‍येकी १० हजार रूपये तसेच पक्षातर्फे प्रत्‍येकी ३ हजार रूपये मदत प्राथमिक स्‍तरावर करण्‍यात आली असली तरीही आणखी काय मदत करता येईल, ही बाब तपासून आणखी मदत देण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Landslide  घुग्‍गस येथे मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर धनादेशाचे संबंधित कुटुंब प्रमुखांना वितरण करताना ते बोलत होते.  यावेळी देवराव भोंगळे, तहसीलदार निलेश गोंड, विवेक बोढे, पंचायत समितीचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप आदी उपस्थित होते.

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

1 307 Landslide : भूस्‍खलन घटनेची पुनरावृत्‍ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार

                  चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात 26 ऑगस्ट रोजी गजानन मडावी यांचे घर भुस्खलनामुळे जमिनीत 60 ते 70 फूट जमिनीत गेले.  Landslide  या घटनेची मंत्री मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अधिका-यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. 

 यावेळी गावक-यांसोबत चर्चा करतांना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावक-यांना दिले होते. यासाठी स्वत: पुढाकार घेत मुंबईत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 10 दिवसांच्या आत 16 लक्ष रुपयांचा निधी पीडित कुटुंबासाठी मंजूर करून आणला.  Landslide भूस्खलनाचा धोका असलेल्या 160 कुटुंबांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरीत केले आहे. मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला 10 हजार रुपये याप्रमाणे 16 लक्ष रुपये तातडीने वाटण्यात आले आहे.  कार्यक्रमाला संतोष नुने, अमोल थेरे, शरद गेडाम, सुशील डांगे, विवेक तिवारी, विनोद चौधरी, हेमंत कुमार, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, विनोद जंजर्ला, चिन्‍नाजी नलबोगा आदींची उपस्थिती होती.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update