Large corruption waste processing
Environment Solapur City

ऐन दिवाळीत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पुकारले बंद; कचरा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

वेतन न झाल्याने झोन 2 व 3 मधिल घंटागाडी बंद; रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
सोलापूर- दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शहरातील झोन 2 व 3 मधिल कचरा न उचलल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढिग साचले होते. लॉकडाऊन काळात घोडके कॉन्ट्रॅक्टरने शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता घेतला असून अनेकवेळा कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणे, पीएफ न देणे, विमा न काढणे, ड्रायव्हरला व बिगारीला कागदोपत्री पगार व कटिंग पगार मधिल फरक घेणे अश्या अनेक प्रकरणात घोडकेने कर्मचाऱ्यांवर संक्रांत आणली आहे. मंगळवारी अचानक बंद पुकारल्याने त्या भागातील नगरसेवक सुरेश पाटील यांनी सकाळी 3 नंबर झोन व संपूर्ण भवानी पेठेतील नागरिकांच्या कचऱ्याची समस्या पाहणी केले. घोडके यांचा मक्ता रद्द करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे तक्रार करू अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले.

     दिवाळीच्या मुहूर्तावर झोन क्रमांक 2 व 3 मधिल घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून घंटागाडी कर्मचारी काम बंद पुकारण्यात आले. सणासुदीच्या काळात लाखो टन कचरा घरोघरी व रस्त्यावर असताना अचानक पुकारलेल्या बंद मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच महिन्यांपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांची पगार न झाल्याने तसेच दिवाळी बोनस न मिळाल्याने आज शहरातील काही भागातील कचरा उचलण्यात आले नाही. घंटागाडी कर्मचारी गरीब असल्याने सणासुदीच्या काळात पगार, बोनस व इतर सुविधा न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे.

Large corruption waste processing

        काही घंटागाडी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच, विमा योजना, काहींना प्रायव्हेडन्ट फंड न देणे, ड्रायव्हर व बिगारी यांचे वेतन कागदोपत्रीपेक्षा कमी देणे अशी पिळवणूक गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मध्यंतरी पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे पूर्ण तास न भरल्याने दंड आकारण्यात आले होते. तसेच अनेक भागात घंटागाडी घरोघरी जाऊन कचरा उलचलत नसल्याचे उघडकीस आले आहे. जसे शंकराचे तिसरा डोळा उघडताच कोणती घटना घडली आहे सर्वांना माहीत असून तसेच आमच्या पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तिसरा डोळा उघडून सदर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करावे आणि मक्तेदारास काळ्या यादीत नाव टाकावे. जर असे न झाल्यास आयुक्त व संबंधित अधिकारी आणि मक्तेदार हातमिळवणी केली असेल तर घंटागाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शहरातील कचरा व्यवस्थापन प्रश्नी आम्ही आंदोलन करु असा इशारा सुरेश पाटील यांनी दिले.

Large corruption waste processing

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143