Maharashtra

लोकमान्य टिळक यांचा वारसा’ या विषयावर व्याख्यान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली-   महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत  विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर  हे उद्या २७ मार्च २०२१ रोजी  ‘लोकमान्य टिळकांचा वारसा’ या विषयावर दहावे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. २७ मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या दहाव्या दिवशी डॉ. अशोक चौसाळकर हे दुपारी २  वाजता विचार मांडणार आहेत.

डॉ. अशोक चौसाळकर यांच्या विषयी

डॉ. अशोक चौसाळकर हे नामवंत विचारवंत आणि राज्यशास्त्रज्ञ आहेत. मुळचे अंबाजोगाई येथील डॉ. चौसाळकर यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात एम.ए ची पदवी आणि पीएचडी संपादन केली. डॉ. चौसाळकर १९७९ मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून रुजु झाले व २०१० मध्ये या विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. डॉ. चौसाळकर यांची ‘नवरात्र’, ‘न्याय आणि धर्म’ अशी मराठीत १३ तर ‘सोशीयल अँड पॉलिटीकल इंम्प्लीमेंटेशन्स ऑफ कॉनसेप्ट्स ऑफ जस्टीस अँड धर्म’, ‘रिबेलीयन ॲंड स्टेट’ आदी १० पुस्तके इंग्रजीत प्रकाशित आहेत. विविध संशोधन पत्रिकांमध्ये त्यांचे ७० लेख प्रकाशित आहेत. त्यांनी १० पुस्तकांचे संपादनही केले आहे. २०११ पासून ते ‘समाज प्रबोधन पत्रिका’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. समाजवादी प्रबोधिनी, डॉ. आंबेडकर अकादमी, प्रगत प्रतिष्ठान, राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट या संस्थांशी ते संबंधीत आहेत.

रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण  

रविवार 28 मार्च 2021 रोजी  दुपारी  2  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143