fbpx
lets-bring-garbage-in-the-smc

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर SMC – गेल्या तीस वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी कचऱ्याच्या विषयाच्या संदर्भात पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क महापालिकेमध्ये ट्रक भरून कचरा आणून टाकले होते. त्याची दखल घेत त्या वेळी पालिका प्रशासनाने कचऱ्याच्या संदर्भात उपाययोजना केली होती. त्याचे पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याची पालिका प्रशासनाने दखल घ्यावी.

             दरम्यान SMC विश्रांती चौक ते रूपा भवानी चौक या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरच मोठ्याप्रमाणात चक्क कचरा साचला आहे याकडे कुठल्याही प्रकारचे पालिका प्रशासन लक्ष देत नाही या मार्गावर लिंगायत स्मशानभूमी आहे तसेच सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालय आणि लाखो भक्तांची आराध्यदैवत रुपाभवानी मंदिर आहे. या मार्गावरून ये-जा करण्यासाठी मोठी वर्दळ असे अंत्यविधीसाठी तसेच रूपा भवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो नागरिक या मार्गावरून जात असतात. रस्त्यावरच तसेच येथील डीवाईडर मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि रस्त्यावर माती साचल्याने या मार्गावर दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहे यामुळे सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच या मार्गावरील अमृत योजनेतून ड्रेनेजचे काम झालेले असून त्यामधील रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याची त्वरित दुरुस्ती करावी याकडे देखील पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तरी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यावरील संपूर्ण कचरा नियमितपणे उचलावा आणि या मार्गावरील डीवाईडर मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण व मोठ्या प्रमाणात झाडे लावावीत अन्यथा महापालिके SMC मध्ये  कचरा आणून टाकू असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांचे सुपुत्र बिपीन पाटील यांनी दिला आहे.
               दरम्यान यावेळी या संदर्भात पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना ही कचऱ्याची समस्या बिपीन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले तात्काळ धनराज पांडे यांनी हा कचरा उचलण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमण्याची ग्वाही दिली. यावेळी उपायुक्त धनराज पांडे यांनी विश्रांती चौक ते रुपाभवानी चौक या मार्गावरील बिपीन पाटील यांच्यासमवेत पाहणी करून यासंदर्भात ठोस निर्णय घेऊ आणि ही कचऱ्याची समस्या दूर करण्यात येईल असे धनराज पांडे यावेळी म्हणाले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update